लहानपणापासुन मी २०% राजकारण आणि ८०% समाजकारणाच्या वातावरणात वाढलो. आमचे शेठ्बाबा आणि माझे वडील आदरणीय वै. सोपानशेठ शेरकर हे समाजकारण व राजकारणाच्या माध्यमातुन सर्व सामान्यांची सेवा करत आले. त्यांनी केलेली विकास कामे आपण सर्व जाणताच. त्यांचे कर्तव्य सर्व जनसामान्यांना ज्ञात आहे. त्यांच्या सेवेचा व कर्तव्याचा हा वारसा सक्षमपणे पुढे चालवण्यासाठी श्री विघ्नहर सह. सा. कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी, येथीलयुवा, जेष्ठ आणि सर्व नागरिकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकूणच स्वराज्याचे स्वप्न ज्या आपल्या रयतेच्या राजाने पाहिले, ज्या राज्याचा शिवनेरीवर जन्म झाला त्या राज्याच्या जुन्नर तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर अधिक ठळक करण्यासाठी मी सत्यशील शेरकर आपला एक नम्र सेवक म्हणून आपल्या समोर येत आहे. जगावं कस हे आपल्याला संत महात्म्यांनी शिकवलं परंतु मानुस म्हणून काम करावं कस हे माझ्या वाड वडीलांनी आणि जेष्ठांनी शिकवलं! आपना समोर येण्याची संधी आदरनीय वै. सोपानशेठ शेरकर म्हणजे माझे वडील यांच्यामुळे प्रात्प झाली. ही संधी म्हणजे मी आजवर केलेल्या छोट्या-मोठ्या सामाजिक, शैक्षणिक, राजकिय कार्याची घेतलेली एक मोठी दखल आहे. या मागे माझ्या वडीलांनी आणि शेठ बाबांनी केलेले संस्कार आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभलेले सहकारी मित्रांचे मार्गदर्शनाचा सिंहाचा वाटा आहेच. परंतु शेतकरी, तरुण सहकारी, आणि तुमच्या शुभेच्छा व आशिर्वादा शिवाय हे कसे शक्य आहे? तेव्हा अगदी मना पासुन मी सर्वाना सलाम करतो.
माझा मराठीचा बोलु कौतुके! परि अमृतातेही पैजा जिंके!! अशी ही माझी मराठी माती. नव्या वाटा शोधणारे, नव निर्मितीला जोपासणारे, अशक्य ते शक्य करुन दाखविणारे, अहोरात्र झटणारे, अहोरात्र लढणारे, प्रत्येक मराठी मनाचा अभिमान असणारे छ्त्रपती शिवराय यांच्या जन्माने पुन्य पावन झालेला जुन्नर तालुक्याचा महिमाच वेगळा. सर्व जाती भेद दूर करुन शाहु – फुले – आंबेडकर यांनी मानसाच्या विकासाची लढाई लढली, म्हणुन या भुमीचा व येथील प्रत्येकाचा विकास साधणे, त्यांच्या हक्कासाठी लढणे हे मला माझे कर्तव्य वाटते. शिवरायांच्या या भुमीत जन्माला आल्याचा मला त्यामुळे अभिमान वाटतो.
'पायाने चालणारी माणसे फक्त जमिनीवरुनच चालत राहतात परंतु योग्य नियोजन करुन बुध्दिने चालणारी मानस आभाळात झेप घेऊन इतिहास घडवितात. म्हणुन तर बदलत्या काळा बरोबर काही प्रश्नांकडे नव्या दृष्टीने बघण्याची गरज आहे. शेतकरी आणि कष्टकरी यांचा विकास, युवकांसाठी रोजगार, शेतीचे आधुनिकीकरण, आरोग्य, शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण अशा अनेक प्रश्नांवर दीर्घकालीन उपाय करण्याची आज आवश्यकता आहे. कोणत्याही प्रकारची भेदभावाची दरी न करता समान दृष्टीकोन असण्यासाठी सर्वांच्या साथीने आपणास विकासाचा लढा लढायचा आहे. त्या साठी हवी आपली साथ!
एक वेळ आपला विकास झाला नाही तरी चालेल परंतु या तालुक्यातील गरीब जगला पाहिजे, माझा शेतकरी बांधव अभिमानाने ताठ उभा राहिला पाहिजे, असे समाजकारणाचे बाळकडु मला लहानपणीच माझे शेठबाबा आणि वडीलां मार्फत मिळाले. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, या न्यायाने जनसेवेचे, दिनदुबळ्यांच्या मदतीचे, गरीबाला शक्य ती मदद करण्याचे संस्कारही लहानपणीच रुजले. मनातुन विचार बाहेर पडले. विचारातुन स्वभाव घडत गेला, त्यातुन समाजकार्याची गोडी लागली. अनेक का मेहनतीतुन घडु लागली. शिरुर लोकसभा युवक कॉग्रेसचे उपाध्यक्षपद, पुणे जिल्हा युवक कॉग्रेस अध्यक्ष, शिरोली कृषक सेवा सह. संस्थेचे अध्यक्ष, पुणे जिल्हा बाजार समिती संचालक, निवृत्तीशेठ ग्रामीण नागरी पतसंस्था शिरोलीचे संचालक, याशिवाय विघ्नहर सह. साखर कारखान्याच्या चेअरमन पदी काम करण्याची संधी मिळाली. समाजकारण करण्यासाठी व लोक विकास साधण्यासाठी राजकारण हे एक प्रभावी माध्यम असल्याची मला जाणीव झाली. उणीवां शिवाय जाणीव निर्माण होत नाही आणि जाणीवे शिवाय कार्य अधुरे राहु शकते म्हणुन तर जाणीवेतुन मोठ्या पटलावर कार्यकरण्यासाठी व आपल्या विकासासाठी मी सदैव कटिबध्द राहील.
अंधारातुन प्रकाशाकडे जाताना, मला गरज आहे तुमच्या सोबतीची, तुमच्या अनमोल विचारांची ! तुमचं व माझ नात विचारांनी व सामाजीक विकासाने दृढ करण्यासाठी मी उत्सुक आहे. माझ्या परिवाराने कोणाची ही प्रतारणा केली नाही. हव्यास, लोभ या पासुन तर आम्ही किती तरी दुर आहोत. आमच्या परीवाराला मानसे जोडायला आवडतात, मानसांशी नाती जोडायला आवडतात, जोडलेली नाती जपायला आवडतात. कारण माझा विश्वास आहे की आपण कमावलेली संपत्तीही आपण बरोबर घेऊन जाणार नाही. परंतु आपण जोडलेल्या मानसांच्या डोळ्यातील अश्रुचा एक थेंब हाच आपल्या करीता लाख मोलाचा दागिना आणि यासाठी मानसांशी जोडलेले हे नाते आपल्यासाठी अनमोल असेल!
धन्यवाद!
आपला
सत्यशिल सोपानशेठ शेरकर.